दि.२६/०८/२०२३ रोजी वीज वितरण कंपनीकडून त्यांचे महत्वाच्या दुरूस्ती कामांसाठी घेण्यात येणा-या शट डाउनमुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार असले बाबत..
नगर,प्रतिनिधी.(25.ऑगस्ट.2023.) : अहमदनगर महानगरपालिकेमार्फत कळविण्यांत येते की, शनिवार दि. २६/०८/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी तसेच वीज वितरण कंपनी यांचेकडून दुरुस्ती कामासाठी सकाळी ११.०० ते ०५.०० वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. व त्यामुळे वीजे अभावी मुळानगर, विळद या ठिकाणाहून उपसा होणारे पाणी बंद राहणार आहे. उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. २६/०८/२०२३ रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर,मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरुडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास[ सकाळी ११.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास] पाणी पुरवठा होउ शकणार नाही. सदरचा पाणी पुरवठा हा रविवार दि.२७/०८/२०२३रोजी करणेत येईल.रविवार दि. २७/०८/२०२३ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या सावेडी उपनगर भागातील गुलमोहर रोड, सिव्हील हाडको, इत्यादी इत्यादी भागात महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणी पुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार दि. २८/०८/२०२३ रोजी करण्यात येईल.तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन अहमदनगर महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.