आपली संस्कृती जपणे काळाची गरज. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

आपली संस्कृती जपणे काळाची गरज. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

अहमदनगर,प्रतिनिधी. (14. ऑगस्ट.2023.) : डी जे च्या गोंगाटात देखील आपली संस्कृती अविरतपणांनी जपणाऱ्या ताल योगी प्रतिष्ठानचे कार्य हे कौतकस्पद असेच आहे. आपली संस्कृती जपणे ही काळाची गरज असून ते गेल्या दशका पासून जपत आले यांबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.तालयोगी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दशकपूर्ती समारंभात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर नरेंद्र फिरोदिया,अभिजित खामकर,वसंत राठोड, माणिकराव विधाते,निखिल वारे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना ते म्हणाले की सध्या मोठमोठ्या इव्हेंटचा काळ, या काळात डी जे सारखी आधुनिक काळातील संगीत यंत्रणा ऐकण्याकडे सर्वांचा ओढा असताना आपली मूळ संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी हे प्रतिष्ठान जी मेहनत घेत आहे त्या बद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन. आपल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ढोल ताशांचे पथक असेच लोकांचे मनोरंजन करीत राहील असा विश्वास असून राजकीय पक्षाच्या मोठ्या कार्यक्रमासाठी तसेच शासकीय कार्यक्रमासाठी  आपली शिफारस नक्की करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.ताल योगी प्रतिष्ठानच्या ढोल ताशांची एक नवीन ओळख सबंध राज्याला व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.यावेळी ढोल ताशांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी भगवा ध्वज खा.विखे यांनी हवेत फैलावून या सादरीकरणास दाद दिली.या दशकपूर्ती समारंभास परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top