महावितरणतर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन.

Ahmednagar Breaking News
0

  महावितरणतर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन.

नगर,प्रतिनिधी.(31.ऑगस्ट.2023.) : सन्माननीय वीज ग्राहक,आपणांस सविनय कळवू इच्छितो की सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे वीज पुरवठा आणि विजेची मागणी यात तफावत येत असल्याने विद्युत यंत्रणेचा समतोल राखण्यासाठी केव्हाही (म्हणजेच सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री-अपरात्री, पहाटे.)वरीष्ठ कार्यालयातून फिडरचा सप्लाय बंद आणि सुरू करण्याचे आदेश येतात, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला तुमच्या गावाचा, परिसराचा सप्लाय बंद करावा लागतो.तसे न केल्यास संपूर्ण यंत्रणा बंद पडण्याची शक्यताआहे.सदर कारणास्तव इमर्जन्सी लोडशेडिंग वरीष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार करावे लागते परंतु त्यात तुमच्या लाईनमन, सबस्टेशन ऑपरेटर, सेक्शन इंजिनिअर यांचा काही एक दोष नसतो.यंत्रणेचा समतोल राखण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करावे लागतात, त्यामुळे इमर्जन्सी लोडशेडिंग झाल्यावर कोणालाही दोष न देता महावितरण कंपनीस / कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे ही नम्र विनंती.लवकरच परिस्थिती पूर्ववत होऊन आपल्याला अखंडितपणे वीजपुरवठा मिळेल तोपर्यंत होणाऱ्या गैरसोयी बद्दल महावितरणतर्फे आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top