सर्व नागरिकांना अहमदनगर महापालिकेने केले आवाहन....

Ahmednagar Breaking News
0

सर्व नागरिकांना अहमदनगर महापालिकेने केले आवाहन....

नगर,प्रतिनिधी.(01.सप्टेंबर.2023.) : आज दुपारी दोन वाजले च्या सुमारास अहमदनगर शहरात पाणीपुरवठा करणारी नवीन मुख्य 1100. एम एम (PSC) जलवाहिनी खडकवाडी गावाजवळील पाटोळे वस्ती येथे पाण्याच्या व हवेच्या दाबाने तडा जाऊन फुटलेली आहे. त्यामुळे सदरहू जलवाहिनी द्वारे मुळा नगर येथून होणारा पाणी उपसा बंद करण्यात आलेला आहे.  तसेच सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आलेले आहे. परंतु दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने त्यास अवधी लागणार आहे. दरम्यान काळात सदर जलवाहिनीद्वारे मुळा नगर,विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे सदर जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने पाणी उपसा पूर्ववत होईपर्यंत म्हणजेच शनिवार 02 सप्टेंबर व रविवार 03 सप्टेंबर रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या सर्व मध्यवर्ती भागात सर्व उपनगर या भागात उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच शनिवारी नियोजित पाणी वाटप असलेल्या सावेडी,भुतकरवाडी परिसर,बोरुडे मळा परिसर, बालिकाश्रम रोड या भागाचे पाणी वाटप बंद राहणार असून या भागात रविवारी पाणी वाटप करण्यात येईल. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे जाहीर आवाहन अहमदनगर महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top