शिर्डीकरांच्या प्रेमाची परतफेड विकास कामातून करणार.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

शिर्डीकरांच्या प्रेमाची परतफेड विकास कामातून करणार.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.

शिर्डी,प्रतिनिधी. (15. सप्टेंबर.2023.) : शिर्डीकरानी विखे पाटील परिवारावर भरभरून प्रेम केले आहे,या प्रेमाची परतफेड विकास कामातून करणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे आयोजित युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना व जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अभय शेळके पाटील, उत्तमभैया कोते,जगन्नाथ गोंदकर,नितीन कोते यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 यावेळी बोलताना ते म्हणाले की शिर्डीच्या विकासा करिता आम्ही सदैव कटीबद्ध असून पुढील दोन वर्षात या परिसराचा सर्वांगीण विकास करावयाचा आहे. जेणेकरून पुढील पन्नास वर्ष या भागातील नागरिकांच्या रोजगार, उद्योग, तसेच पायाभूत सुविधा ह्या पूर्ण होतील. आजवर आमच्या प्रत्येक निवडणुकीत आपण सर्वांनी आम्हाला भरभरून दिले आहे. या भागातील तरुणांनी देखील माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आता माझी जवाबदारी असून या तरुणांच्या हाताला काम तसेच माताभगिनीसाठी त्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. याचाच एक भाग म्हणून नुकताच आदिकमहिन्यात या परिसरातील महिलांसाठी तीर्थ यात्रेचे आयोजन केले होते. पन्नास हजार पेक्षा जास्त महिलांनी ही तीर्थ यात्रा केली असून याचे पुण्य आमच्या परिवारास आपल्या सहकार्य मुळेच मिळाले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

 विखे पाटील परिवार हा कायम नैतिकतेने काम करत आला असून याची पावती म्हणून आपण सर्वांनी मला वयाच्या केवळ ३५व्या वर्षी खासदार करून संसदेत पाठवले, अनेकांचे अख्खे आयुष्य गेले त्यांना नगरसेवक होता आले नाही, मात्र आपल्या सहकार्य मुळे मला थेट दिल्ली गाठता आली. याप्रेमाची परतफेड करणे हे सोपे नाही मात्र आपण जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो सार्थ ठरविण्याचा शब्द याप्रसंगी देतो असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा शिर्डीत प्राईम लोकेशनवर बसविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय शिवसृष्टी देखील उभारणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाच्या प्रारंभी शिर्डीतून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी झाले होते.या कार्यक्रमास विजय जगताप, तुषार सदाफळे, सुजित गोंदकर, वीरेश चौधरी, डॉ. कथके, दीपक वारुळे, विजय कोते, नितीन शेळके, निलेश कोते, कैलास फातोरे, बजाव ग्रुप, शिवशाही तरुण मंडळ, विराट प्रतिष्ठान, आणि युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटनेचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top