पोलिसांना राखीचे बंधन,संजयनगर परिसरातील महिलांनी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला रक्षाबंधनाचा सण.

Ahmednagar Breaking News
0

पोलिसांना राखीचे बंधन,संजयनगर परिसरातील महिलांनी  कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला रक्षाबंधनाचा सण.

अहमदनगर, प्रतिनिधी. (04.सप्टेंबर 2023.)  : स्नेहालय संस्था अंतर्गत काम करणारे संजय नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, बालभवन, स्नेहाधार उडान या प्रकल्पांच्या संयुक्त विद्यमानाने  संजयनगर सेवा वस्तीतील महिला,आणि  मुलींनी रक्षाबंधनानिमित्त नगर शहरातील मध्यवर्ती कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या कार्यक्रमाला अनेक पोलिसांनी हजेरी लावत शहरातील भगिनींच्या रक्षणाचे वचन दिले.रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही सण, पोलिसांना शहरातील शांतता, कायदा सुव्यस्था सांभाळण्यासाठी कामावर हजर राहावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधनासारखा सण साजरा करता येत नाही. त्यामुळे संजयनगर येथील काही शाळेतील विद्यार्थिनींनी, महिला आणि तरुण मुलींनी यंदाचे रक्षाबंधन पोलिसांसोबत साजरे करण्याचे ठरवले. संजयनगर येथील मध्यवर्ती कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरे केले.यावेळी पोलिसांनी आपल्या दैनंदिन कामकाजाबाबत,संरक्षणाविषयी या सर्व महिला व मुलींना माहिती दिली.आम्हाला अनेकदा कामामुळे आमच्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करता येत नाही, आज शहरातील या शाळकरी महिला मुलींनी आमच्यासोबत रक्षाबंधन साजरे केल्याने, आम्हालाही अत्यंत आनंद झाल्याची भावना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी  पोलिस निरीक्षक श्री.चंद्रशेखर यादव, यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top