सात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जेरबंद असलेल्या आरोपीला अखेर औरंगाबाद खंडपीठाने केला जामीन मंजूर.

Ahmednagar Breaking News
0

मोक्का प्रकरणातील प्रमुख आरोपीला औरंगाबाद खंडपीठाने केला जामीन मंजूर. 

औरंगाबाद,प्रतिनिधी. (27.ऑक्टोबर.2023.) : सात वेगवेगळ्या गुन्हयांमध्ये जेरबंद आरोपी संदीप कदमला अखेर मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवार, 25 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला.

थोडक्यात घटना अशी की, फिर्यादी नामे ज्ञानेश्वर गजरे यांनी ४/३/२०२१ रोजी पोलीसांकडे अशी फिर्याद नोंदवली की, फिर्यादी हा वाहतूकीचा ट्रक घेऊन बारामतीहुन ओरीसाकडे जात असताना अज्ञात इसमांनी नगर परीसरात सदर ट्रक अडवून फिर्यादीला मारहाण करून त्याजवळील रोख रक्कम तसेच इतर सामान पळविले. सदर प्रकरणात आरोपी संदीप कदम व इतर साथीदारांना अटक करून आरोपींकडून सर्व मुद्देमाल जप्त केला. तद्नंतर सदर आरोपीला मा.अहमदनगर सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला असता पोलीसांच्या लक्षात आले की, सदर आरोपीवर दरोड्याचे सात गुन्हे आधीच दाखल होते.पोलीसांनी आरोपीविरुद्ध मोक्का अंतर्गत प्रस्ताव दाखल केला व त्यासाठीची रीतसर परवानगी अतीरिक्त महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिली. पोलिसांनी मा. सत्र न्यायालय अहमदनगर येथे आरोपीला दिलेला जामीन रद्द करण्यासाठी रीतसर अर्ज केला व तो अर्ज मंजूर होऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

सदर मोक्का प्रकरणात आरोपीने पुन्हा मा.सत्र न्यायालय अहमदनगर येथे जामीन अर्ज सादर केला असता तो फेटाळण्यात आला. सदरील आरोपीने अॅड. शशिकांत शेकडे व अँड.सुबोध जाधव यांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करताना असे मत नोंदविले कि, जरी आरोपीविरुद्ध सात गुन्हे प्रलंबीत असले तरी पोलीसांच्या तपासात त्याचे निष्कर्ष दिसून येत नाहीत. जी कागदपत्रे तपासात दिसून येतात त्यानुसार मोक्काच्या तरतूदी लागू होणार नाहीत. तसेच आरोपीच्या वकीलांनी असा युकीवाद केला की, सातपैकी एका प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता झालेली आहे. इतर गुन्हयात आरोपीला मुद्दामून गोवण्यात आलेले प्रथमदर्शनी दिसते. मोक्का अंतर्गत कलमे सदर आरोपीविरुद्ध लागु होत नाहीत. सदरील मुद्दे लक्षात घेऊन मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे मा.न्यायमूर्ती श्री. एस. जी. चपळगांवकर यांनी आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले.आरोपीतर्फे अँड शशिकांत शेकडे व सुबोध जाधव यांनी काम पाहीले व सरकारतर्फे अँड.एस.बी.नरवडे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top