पुणे येथील धनाड्य व्यक्तीस लुटल्याचे आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता.

Ahmednagar Breaking News
0

सोन्याचा हांडा सापडला, कमी किंमतीत खरेदी देतो असा फोन करुन पुणे येथील धनाड्य व्यक्तीस लुटल्याचे आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता.

नगर,प्रतिनिधी. (14. ऑक्टोबर.2023.) : अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अहमदनगर येथील आठ आरोपी विरुद्ध भा.द.वि. कलम ३९५, ४२० प्रमाणे एम.आय.डी.सी. पो.स्टे.येथे गु.र.नं. ३४/१९ या दाखल गुन्हयाचे संदर्भात खटला चालू होता.सदर खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी हा पुणे येथील राहणारा व्यक्ती दिपक थोपटे असून त्यास अज्ञात व्यक्तींनी फोन करुन सांगितले की,घराचे खोदकाम करताना त्यांना सोन्याची कळशी मिळून आली आहे व ती त्याला कमी दरात विक्री करायची आहे अशी माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी दिपक हा नगर येथील पांढरीपुर येथे ते सोने खरेदी करण्यासाठी आला त्यावेळी आरोपी यांनी त्याला सोन्याची अंगठी दिली व त्यानंतर सदर फिर्यादी याला औरंगाबाद हायवे रोड, नगर येथे घेऊन गेले व तेथे फिर्यादी दिपक यास मारहाण करुन त्याचे ताब्यातील ३५ ग्रॅम सोन्याची चैन, आय फोन, ८० हजार कॅश, चष्मा, रॅडो वॉच, १० तोळे चैन इ. वस्तुंची लुट केली होती. त्यानंतर पोलीसांनी सर्व आरोपींना अटक करुन तपास सुरु केला व सदर खटला न्यायालयात चालविण्यात आला. त्यानंतर आरोपी यांनी न्यायालयात त्यांचे वतीने कामकाज पाहणेसाठी अहमदनगर येथील अॅड. महेश तवले यांची नेमणुक केली.सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र आरोपी यांचे वकीलांनी न्यायालयाचे निदर्षणास आणून दिले की, सरकार पक्षास आरोपींविरुद्ध संशयातीत रितीने आरोप सिद्ध करता आला नाही व त्यांचे विरुद्ध गुन्हा शाबीत झाला नाही.त्यामुळे न्यायालयाने सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.आरोपीचे वतीने अॅड. महेश तवले यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top