प्रा.प्रणित हजारे यांना औषधनिर्माण शास्त्राची पी.एच.डी.प्रदान.

Ahmednagar Breaking News
0

 प्रा.प्रणित हजारे यांचा पी.एच.डी.मिळाल्याबद्दल सत्कार करताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील.

 


नगर,प्रतिनिधी.(17ऑक्टोबर.2023.) : अहमदनगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यायलामधील प्रा.प्रणित पांडुरंग हजारे यांना नुकतीच औषधनिर्माण शास्त्रामधील विद्या वाचस्पती (पी.एच.डी.) पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. डॉ. प्रणित हजारे हे भिंगार अर्बन बँकेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग हजारे यांचे चिरंजीव असून पद्मभुषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांचे पूतणे आहेत.डॉ.प्रणित हजारे यांनी डॉ.पुणित रच्च यांच्या मार्गदर्शना खाली “फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ नोवेल गॅस्ट्रोरिटेनटीव्ह मायक्रोबलून” या विषयावर शोधप्रबंध सादर केला. यासाठी डॉ.अभिजीत दिवटे, संचालक, विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व कॉलेज, डॉ.पी.एम.गायकवाड, सचिव, डॉ.विखे पाटील फाऊंडेशन, डॉ.पी.वाय.पवार प्राचार्य, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, डॉ.आर एल सावंत, उपप्राचार्य, डॉ.एस.झेड.चेमटे,विभागप्रमुख, प्रा.के.एन. तरकसे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल प्रणित यांचे नामदार  राधाकृष्ण विखे पाटील,मंत्री, महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास तथा पालकमंत्री,अहमदनगर, सौ.शालिनीताई विखे पा.मा.जि.प.अध्यक्षा ,डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील, खासदार अहमदनगर मतदार संघ व सौ.धनश्रीताई विखे पाटील, व महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सीलचे माजी अध्यक्ष ॲड.चांगदेव डुबे पाटील यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top