पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर जिल्हा दौऱ्याच्या नियोजनासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बैठका संपन्न.
नगर,प्रतिनिधी.(19.ऑक्टोबर.2023.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नगर जिल्ह्याच्या दृष्टीने मोठी उपलब्धी ठरणार असून,मागील नऊ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीची कृतज्ञता यानिमिताने व्यक्त करण्याची संधी जिल्ह्याला मिळाली आहे.पंतप्रधान मोदी विश्वनेते म्हणून येत असल्याने त्यांच्या स्वागताकरीता प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरेल असा विश्वास महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमधून व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील नियोजित दौर्याच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक कोहीनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस माजी मंत्री आ राम शिंदे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले आ.मोनिका राजळे माजी आमदार वैभव पिचड नगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग उतर नगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे नगर शहराचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह सर्व तालुक्याचे पदाधिकारी कार्यकर्ते बुथ प्रमुख विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.मंत्री विखे पाटील म्हणाले की उतर नगर जिल्ह्याच्या जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरण कालव्यांचे लोकार्पण विमानतळ इमारतीचे भूमीपूजन साई संस्थानच्या दर्शन काॅम्पेल्क्सचे उद्घाटन असे कार्यक्रम मोदीजींच्या उपस्थित संपन्न होणार असून या कार्यक्रमाला केद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गावपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन केले.पंतप्रधान नरेंंद्र मोदी यापुर्वी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात आले.मात्र आता त्यांचे येणे विश्वनेत्याच्या रूपात असल्याने त्यांच्या स्वागतात कुठेही कमी पडायचे नाही असे आवाहन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की जी २० परीषदेपासून ते चांद्रयान मोहीमेच्या यशस्वीतेपर्यत देशाची प्रतिमा जगात पोहचवली आहे.नऊ वर्षाच्या कार्यकाळात जनसामान्या करीता सुरू केलेल्या योजनांची अंमलबजावणीची कृतज्ञता या कार्यक्रमातून व्यक्त करण्याची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आ.राम शिंदे शिवाजीराव कर्डीले यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.शिवसेना शिंदे गटाची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.खा.सदाशिव लोखंडे खा.डॉ.सुजय विखे पाटील,बाबुशेठ टारयवाले,अनिल शिंदे,दिलीप सातपुते,सुभाष लोंढे यांच्यासह विविध तालुक्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवून पुढे निघाल्यामुळे राज्यात युतीचे सरकार आले.समन्वयाने काम सुरू आहे.पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वाखाली सरकार निर्णय करीत असून हाच समन्वय जिल्हास्तरावर सुध्दा निर्माण करण्याच्या दृष्टीने मोदीजींचा दौरा महत्वाचा ठरणार असून आगामी निवडणुकांच्या करीता या दौर्याचे परीणाम सकारात्मक पाहायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी खा.डॉ सुजय विखे पाटील खा.सदाशिव लोखंडे बाबुशेठ टायरवाले दिलीप सातपुते यांची भाषण झाली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना मंत्री विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भूमिकेला संग्राम जगताप यांनी साथ देण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करून राज्यातील विकासाच्या मुद्दयावरून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत.निवृत अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचा निषेध व्हायला हवा होता.त्यांनी या प्रकरणाबाबत वरीष्ठांकडे तक्रार का केली नाही असा प्रश्न उपस्थित करुन मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुध्दा ज्यांनी कधी भूमिका घेतल्या नाहीत ते आज मत मांडतांना दिसतात.पण मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळाले हे कोणी नाकारणार नाही.विकासाच्या मुद्दयावर एकत्रित येवून राज्य सरकारची वाटचाल मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरू असून याच भूमिकेला अजितदादांनी समर्थन देवून सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका घेतली असल्याकडे विखे पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.आ.संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यानी मनोगत व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा यशस्वी करण्याची ग्वाही दिली.