मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून नगर मधून साखळी उपोषणास सुरुवात.

Ahmednagar Breaking News
0

ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून नगर मधील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात.

नगर,प्रतिनिधी. (25.ऑक्टोबर.2023.) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आज अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज नगर मधून मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने नगर तहसील कार्यालयाजवळ साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. या ठिकाणी नागरिकांसह महिला देखील मोठ्या संख्येने उपोषणास सहभागी झाल्या आहेत.



मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपली आहे मात्र सरकारने अद्याप या बाबत काहीच भूमिका घेतली नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.सरकारला जाग आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आपल्या गावात,शहरात,जिल्ह्यात साखळी उपोषण करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या बरोबरीने अहमदनगर मधील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी पद्धतीने उपोषण सुरु झाले आहे.

मराठा आरक्षणाच्या लढाई मध्ये आपले योगदान देण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी रोज जास्तीत जास्त संख्येने येण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top