मनोज जरांगे यांच्या सभेला मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहणार.

Ahmednagar Breaking News
0

मनोज जरांगे यांच्या सभेला मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहणार.मराठा समाजाकडून नियोजन,नगरला झाली नियोजन बैठक.

अहमदनगर, प्रतिनिधी.(03.ऑक्टोबर.2023.) : मराठा आऱक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगरला ७ आक्टोबर रोजी सभा होत आहे. या सभेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार आहे., त्यासाठी सोमवारी कोहिनुर मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या कार्यकत्यांची नियोजन बैठक झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते उपोषण करत होते.पोलिसांनी अंदोलन चिरडून टाकण्यासाठी लाठीमार केला.तेव्हापासून मराठा समजाला आरक्षण मिळावे या मागणीला अधिक धार आली. महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला. प्रमुख उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील सध्या राज्यात दौरा करत असून मराठा समाजाशी संवाद साधत आहे. याच निमित्ताने ७ आक्टोबर रोजी ते अहमदनगर येथे सायंकाळी सहा वाजता एमआयडीसीतील रेणुका मंगल कार्यालयात जाहीर सभा घेत आहेत. या सभेला नगर शहरासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने मराठा समाज कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित राहतील त्या अनुषंगाने नियोजन केले जात आहे.त्याविषयी चर्चा करण्यासाठी तसेच नवीन सभेचे प्लाॅनिंग करण्यासाठी कोहिनुर मंगल कार्यालयात सकाल मराठा समाजाच्या कार्यकत्यांची बैठक झाली.शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. सभाच्या प्रचार व प्रसारासाठी जास्तीत जास्त फलक लावणे, मनोज जरांगे यांच्यासोबत येणाऱ्या लोकांची व्यवस्था, सोशल मिडिया, प्रसारमाध्यमातून जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करणे आदी विषयावर चर्चा झाली.सभेला किमान दहा ते पंधरा हजार लोक उपस्थित राहतील त्या अनुषंगाने नियोजन असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सभेच्या नियोजन, व्यवस्थेसाठी स्वयंसेवक यांच्या नावाची नोंदणी करण्यात आली. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top