नगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन.

Ahmednagar Breaking News
0

नगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन.

नगर,प्रतिनिधी.(31.ऑक्टोबर.2023.) : नगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होत.संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील टप्यातील आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील गावागावातून गावबंदी, साखळी उपोषण सारखे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहेत. नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर, शेंडी, पोखर्डी, कापूरवाडी, नागरदेवळे यांसह आसपासच्या गावांनी मिळून एकत्रितपणे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको केला असून यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी रस्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.याप्रसंगी महामार्गावर वाहतूक कोंडी पहायला मिळाली. तर या आंदोलनाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली.यावेळी दत्ता तापकिरे, सरपंच रावसाहेब कर्डिले, उप सरपंच जालिंदर जाधव, रवी कर्डिले, मच्छिंद्र कर्डिले, रंभाजी कर्डिले, सागर भगत, सुशील तापकीरे, दीपक शिंदे, किरण पानसरे, नितीन शिंदे, अमोल धाडगे, मंगेश अनवणे, बंडू भगत, सुभाष जगताप, अली शेख, इसाख शेख, अवी तापकिरे, अण्णा कचरे, श्रीधर पानसरे, रंगनाथ कर्डिले, निवृत्ती कर्डिले, धर्मा जाधव आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top