धनादेशाचा अनादर झाल्याने आरोपीला पाच लाखाचा दंड.

Ahmednagar Breaking News
1 minute read
0

धनादेशाचा अनादर झाल्याने आरोपीला पाच लाखाचा दंड.

नगर,प्रतिनिधी. (06.ऑक्टोबर.2023.) : तक्रारदार रमेश शंभुराम चंदे यांनी माळीवाडा भागातील गोवर्धन अपार्टमेंट मधील फ्लॅट नं 27 ही मिळकत अक्षय राजेंद्र गांधी यांना खरेदीखताद्वारे विक्री केली होती.फ्लॅटची मोबदला रक्कम म्हणुन अक्षय गांधीने दिलेला 28,50,000/रुपयांचा धनादेश न वटता परत आल्याने, फिर्यादी - रमेश चंदे यांनी आरोपी-अक्षय गांधी याचे विरुद्ध अहमदनगर येथील मा.अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मा.झाटे साहेब यांचे कोर्टात एस.सी.नं 5194/2019 अन्वये फौजदारी खटला दाखल केला होता.सदर खटल्याची सुनावणी होऊन न्यायनिर्णय 4.10.2023 रोजी झाला असुन, 28,50,000/- रुपयाच्या धनादेशाचा अनादर करणा-या अक्षय राजेंद्र गांधी याला न्यायालयाने 5,00,000/-(पाच लाख.) रुपयांचा दंड व दंडाची रक्कम न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनविण्यात आली. सदरील खटल्यात फिर्यादीतर्फे ॲड.महेश जोशी यांनी काम पाहिले.

To Top