गोर गरिबांची होणारी लुटमार रोखण्यासाठी येत्या सहा महिन्यांत स्टॅम्प पेपर बंद करणार. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आणि आ.बबनराव पाचपुते,आ.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगोंदा तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ.

श्रीगोंदा,प्रतिनिधी.(07.ऑक्टोबर.2023.) : गोर-गरीबांचे जमिनी लाटून मागील काळात झालेल्या लूटमारीला आता हे सरकार चाप लावणार असून पुढील सहा महिन्यांत स्टॅम्प पेपर हे पूर्ण बंद करण्याचा निर्णय राज्यातले महायुतीचे सरकार घेणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

श्रीगोंदा शहर येथील संत श्री शेख महाराज मंदिर परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन वास्तूचा उदघाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.आमदार राम शिंदे व विक्रमसिंह पाचपुते समोयोचित भाषणे झाली.या प्रसंगी आ.बबनदादा पाचपुते,बाबासाहेब भोस,प्रताप भैय्या पाचपुते, नगराध्यक्षा सौ.शुभांगीताई पोटे,उपनगरध्यक्ष सौ ज्योतीताई खेडकर, केशव मगर,बाळासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले की स्टॅम्प पेपरवर गोर-गरिबांच्या जमिनी हडपण्याचे काम मागील काळात याभागात मोठ्या प्रमाणावर झाले, त्यामुळे असे प्रकार राज्यात कुठेही होहु नये याकरिता राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्टॅम्प पेपर हे बंद करून त्या ऐवजी आता फ्रँकिंग सिस्टीम ही सुरू होणार असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यास संमती दिली आहे. येत्या सहा महिन्यांत हे स्टॅम्प पेपर पूर्ण बंद होणार असल्याचे सांगून काही निर्णय घेताना सुरुवातीस थोडा त्रास होतो मात्र याचे दूरगामी चांगले परिणाम दिसतात.वाळूचा असाच ऐतिहासीक निर्णय घेतला काही दिवस याचा त्रास होईल परंतु यातून वाढणारी गुन्हेगारी ही संपूर्णपणे थांबेल असा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला. राज्यात महायुतीचे सरकार एक वर्षापूर्वी सत्तेत आले, या एक वर्षात एकट्या श्रीगोंदा तालुक्यात आ.पाचपुते दादांनी शंभर कोटी रुपयांचे विकास कामे आणली, या विकास कामाचा शुभारंभ आता सुरू झाला असून माविआ सरकारच्या काळात एक फुटकी कवडी त्यावेळच्या राज्यकर्त्यानी दिली नाही आणि आज हेच लोक साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या बाबतीत तोंड वर करून विचारतात हे किती आश्चर्यकारक आहे असे सांगताना खा.विखे यांनी १५ वर्षापासून रखडलेला साकळाई प्रकल्प हा होणारच असा शब्द आपण दिला असून तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचे याप्रसंगी सांगितले. या प्रकल्पाच्या प्राथमिक कामास सुरुवात झाली असून पुढील सहा महिन्यात प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल असे सांगितले.येत्या सहा महिन्यांत या भागात अनेक विकास कामाचा शुभारंभ तर काही रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात झालेली दिसत असे सांगून ६३ कोटी रुपयाचा नवीन उड्डाणपूल देखील आपण मंजूर करून आणला असून लवकरच या कामाचेही भूमिपूजन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.आपल्या एका मतदानाचा परिणाम हा आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यावर होणारा असून आपलं एक मत टाकताना सर्वांनी फक्त आपल्या पुढच्या पिढीकडे पाहूनच ते द्यावे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन टर्म मध्ये आपल्या देशाला कुठून कोठे नेले आज आपला देश महासत्ता देशांच्या यादीत अग्रस्थानी आहे, तो तसाच अधिकाधिक पुढे न्यायचा की पुन्हा अशा लोकांच्या ताब्यात द्यायचा याचा विचार आपण सर्वांनी करावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी  भैय्या लगड,शहाजी हिरवे, बाळासाहेब गिरमकर, अनिल  ढवाळ, मिलिंद दरेकर,  बापू गोरे, पोपट खेतमाळीस तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top