नगरच्या आरुष बेडेकरला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरवली शाखेचा रंग कौतुक पुरस्कार प्रदान.
नगर, प्रतिनिधी.(05.ऑक्टोबर.2023.) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेच्यावतीने लक्षणीय बालकलाकारासाठी, मोहन परब पुरस्कृत, 'रंगकौतुक पुरस्कार' यंदा आरुष प्रसाद बेडेकर याला 1 ऑक्टोबर रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली, मुंबई येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, अशोक हंडे, विजय केंकरे आणि गायक अजितजी कडकडे यांची विशेष उपस्थिती होती.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरीवली शाखेच्या वतीने दरवर्षी कला क्षेत्रात तसेच रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यंदा सुद्धा रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करून लोकादरास पात्र ठरलेल्या ज्येष्ठ रंगकर्मीसाठी असणाऱ्या 'रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार'- मोहन जोशी , व्यावसायिक रंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी, 'मच्छिंद्र कांबळी अभिरंगराज पुरस्कार विजय केंकरे यांना तर, संगीत रंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी, कै. गोपिनाथ सावकार स्मृती, 'गोपिनाथ सावकार स्वररंगराज पुरस्कार' अजित कडकडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. यासह अजूनही अनेक मान्यवरांना या कार्यक्रमात पुरस्कार दिले जाणार आहेत अशी माहिती शाखेचे सचिव हेमंत बिडवे यांनी दिली.योग योगेश्वर जय शंकर या मालिकेत बाल शंकर महाराजांच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला आरुष बेडेकर याने नुकत्याच रंगभूमीवर आलेल्या बोक्या सातबंडे या नाटकातून रसिक प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.या नाटकाने अवघ्या 55 दिवसा 45 प्रयोग करण्याचा एक वेगळा विक्रम सुद्धा केला.दिलीप प्रभावळकर यांच्या पुस्तकातील बोक्याला आरुषने आपल्या अभिनयाने रंगमंचावर जणू प्रत्यक्षात आणलं आहे आणि पुस्तकातला बोक्या खराखुरा रंगमंचावर वावरतोय की काय अशीच सर्व रसिकांची आणी आमच्या अनेक सदस्यांची प्रतिक्रिया येत असल्याने आरुषला हा पुरस्कार जाहीर झाल्याचं बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ गोट्या सावंत यांनी सांगितलं.ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अशोक हांडे यांनी सुद्धा आरुष चे भरभरून कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पहिल्यांदाच दूरचित्रवाणी आणी रंगभूमीवर काम करणाऱ्या आरुष बेडेकर ला आतापर्यंत म.टा. सन्मान, कलर्स मराठी अवॉर्ड , शंकर रत्न पुरस्कार यासारख्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.