पॉक्सो कायद्याचे अंतर्गत दाखल गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता.
नगर, प्रतिनिधी.(14.ऑक्टोबर.2023.) : अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात ब्राम्हणी, ता. राहुरी, जि.अहमदनगर येथील दोन आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याचे अंतर्गत राहुरी पो.स्टे. येथे दाखल गुन्हयाचे संदर्भात खटला चालू होता. सदर खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, पिडीता ही १७ वर्ष वयाची असून ती आरोपी दिलीप साके याचे बरोबर राहात होती. आरोपीने सदर पिडीताशी लग्न करुन तिच्याबरोबर वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. त्यामुळे सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी यांनी न्यायालयात त्यांचे वतीने कामकाज पाहणेसाठी अहमदनगर येथील अॅड. महेश तवले, अॅड. संजय दुशिंग यांची नेमणूक केली.सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र आरोपी यांचे वकीलांनी न्यायालयाचे निदर्षणास आणून दिले की, सरकार पक्षास आरोपींविरुद्ध संशयातीत रितीने आरोप सिद्ध करता आला नाही व त्यांचे विरुद्ध गुन्हा शाबीत झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.आरोपीचे वतीने अॅड. महेश तवले, अॅड. संजय दुशिंग यांनी काम पाहिले.