आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलतर्फे आत्मा मलिक कुस्ती केंद्रातील मल्ल सत्यम चौधरीचे ज्युडो स्पर्धेत यश.

Ahmednagar Breaking News
0

आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलतर्फे आत्मा मलिक कुस्ती केंद्रातील मल्ल सत्यम चौधरीचे ज्युडो स्पर्धेत यश.

नगर, प्रतिनिधी.(28. ऑक्टोबर.2023.) : बुधवार दिनांक 25/10/2023 रोजी त्रिमूर्ती शैक्षणिक व क्रीडा संकुल, नेवासा, (जि.अहमदनगर) येथे पुणे विभागीय शालेय ज्युडो स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

या स्पर्धेत आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलतर्फे आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील 6 मल्लांनी अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आपला सहभाग नोंदवला होता. आणि विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे या सर्वच मल्लांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करत आप आपल्या वजन गटामध्ये पदके मिळवली आहेत. यामध्ये 

2🥇 सुवर्णपदक , 1🥈 रौप्यपदक आणि 3🥉 कांस्य पदकाची कमाई करत एकूण 6 ही मल्लांनी घवघवीत अशे यश संपादन केले आहे.

तसेच सुवर्णपदक 🥇 विजेत्या खेळाडूंची आगामी होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय judo स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सुवर्णपदक 🥇विजेते मल्ल.

१. यश येळे - ३५ किलो 🥇

२. विशाल सोनवणे- ४० किलो  🥇

रौप्यपदक 🥈विजेते मल्ल.

१. सार्थक पांगारकर - ४५ किलो 🥈

कांस्यपदक 🥉 विजेते मल्ल.

१.सत्यम चौधरी -  25 किलो 🥉

२.तुषार रणसिंग - 50 किलो  🥉

३. कृष्णा पवार -   90 किलो  🥉

सर्व पदक विजेत्या मल्लांना आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशिर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष मा.नंदकुमार सूर्यवंशी साहेब आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक ,NIS,राष्ट्रीय कुस्ती कोच गुरूवर्य वस्ताद मा.श्री.भरत नायकल (सर) , NIS Qualified कुस्ती Coach पै.विवेक नायकल ,कुस्ती कोच पै.राजेंद्र पाटील तसेच पै.अक्षय डांगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.सर्व पदक विजेत्या मल्लांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top