विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते दिग्दर्शक अनंत जोशी व बाल कलाकार आदित्य धनंजय जाधव यांचा सत्कार.

Ahmednagar Breaking News
0

"एक रात्र गडावर"या महानाट्याने नगरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. - विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री दादा वेदक.                            

नगर, प्रतिनिधी. (17.ऑक्टोबर.2023.) : शौर्य जागरण यात्रेच्या समारोपप्रसंगी "एक रात्रगडावर"या महानाट्याने नगरकरांचे डोळ्याचे पारणे फेडले.छत्रपती शिवरायांचा पराक्रम व युद्धनीती या नाटकाद्वारे बालकलाकारांनी उत्कृष्टपणे अभिनयाद्वारे मांडली. नवीन पिढीला शिवरायांचा इतिहास माहिती व्हावा.यासाठी दिग्दर्शक अनंत जोशी यांनी सुंदर असे महानाट्य निर्माण केले आहे.तसेच सर्व बालकलाकारांनी अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री दादा वेदक यांनी केले.भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या प्रांगणात शौर्य जागरण यात्रेचे समारोप प्रसंगी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साडेतीनशे वर्ष पूर्ती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “एक रात्र गडावर” हे महानाट्य सादर केल्याबद्दल या माहनाट्य चे दिग्दर्शक अनंत जोशी यांचा व छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणारा बाल कलाकार आदित्य धनंजय जाधव याचा सत्कार आमदार टी. राजा सिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला,यावेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री दादा वेदक,धर्मगुरू राजाभाऊ कोठारी,प्रांत संघाचालक नाना जाधव, बजरंग दलाचे प्रांत सह संयोजक नितीन महाजन,विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अँड.जय भोसले, विभाग मंत्री सुनील खिस्ती, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top