केंद्र सरकार व नाफेड मार्फत दिवाळी सणासाठी नागरिकांना स्वस्त दरात हरभरा डाळ वाटप.- नगरसेवक रामदास आंधळे.
नगर, प्रतिनिधी. (07. नोव्हेंबर.2023.) : केंद्र सरकार व नाफेड मार्फत दिवाळी सणासाठी सावेडी भागातील वार्ड. क्रमांक 4 येथे नागरिकांना स्वस्त दरात हरभरा डाळीचे वितरण नगरसेवक रामदास आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नितीन शेलार, कैलास गर्जे, अभिजित दरेकर,आकाश सोनवणे, प्रोज्योत शिर्के,देविदास म्हस्के,विनायक शुक्रे,छायाताई राजपूत,कमल दरेकर,वैशाली एकबोटे मॅडम,पौर्णिमा यादव यांसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्ड क्रमांक 4 मधील नागरिकांनी स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या हरभरा डाळीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. एका व्यक्तीला 5 किलो हरभरा डाळीचे वाटप करण्यात येत आहे असे नगरसेवक रामदास आंधळे यांनी सांगितले.