शिबिराच्या माध्यमातून 3 लाख मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्याबद्दल नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव.
नगर, प्रतिनिधी.(01.डिसेंबर.2023.) : सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी गेल्या 31 वर्षापासून फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिबिरे घेऊन गोरगरीब रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या आहेत. संभाजीनगर,बीड,मालेगाव,नाशिक,जालना, सोलापूर येथील रुग्णांनाचाही शिबिरात सहभाग.जालिंदर बोरुडे यांनी नोकरी करीत असतांना निस्वार्थपणे,सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक वृद्धांना दृष्टी देऊन ते आधारवड झाले आहेत. नुकतेच गरजू नागरिकांवर मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रमी 3 लाख 1 हजार 111 चा टप्पा पार झाला आहे.हि नगरकरांसाठी भूषणावह बाब आहे.जालिंदर बोरुडे यांचे कार्य नेत्रदीपक आहे असे प्रतिपादन आमदार अरुण जगताप यांनी केले आहे.
नेत्रदुत जालिंदर बोरुडे यांनी शिबिराच्या माध्यमातून 3 लाख 1 हजार 111 नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्याबद्दल त्यांचा श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
केडगाव येथे झालेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिराच्या कार्यक्रमात बोरुडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा,प्रीतपालसिंह धुप्पड,जनक आहुजा,बुधराणी हॉस्पिटलचे प्रकाश धर्माधिकारी, उद्योजक रवींद्र बक्षी,अनिश आहुजा,जतीन आहुजा, कैलाश नवलानी,नेत्रदूत जालिंदर बोरुडे, सुनिल थोरात,जय रंगलानी आदी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले, जालिंदर बोरुडे यांच्या सेवाकार्याने अनेक गरजूंना नवदृष्टी मिळाली आहे. जालिंदर बोरुडे यांनी समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे.बोरुडे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असे आहे.वासन परिवाराने त्यांच्या कार्याची दखल घेऊन केलेला सत्कार हा अभिमानास्पद बाब आहे.असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे म्हणाले,वासन परिवाराने केलेल्या सत्कार हा माझा घरचा सत्कार या सत्कारामुळे मी भारावून गेलो आहे.