राज्यात गाजलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांडातील बाबासाहेब केदार याचे नाव खटल्यातून वगळण्याचे न्यायालयाचे आदेश.

Ahmednagar Breaking News
0

राज्यात गाजलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांडातील बाबासाहेब केदार याचे नाव खटल्यातून वगळण्याचे न्यायालयाचे आदेश.


नगर, प्रतिनिधी. (13.डिसेंबर.2023.) : अहमदनगर शहरासह संपूर्ण राज्यात गाजलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांडातील शस्त्र पुरवल्याचा आरोप बाबासाहेब केदार याच्यावर होता.मात्र बाबासाहेब केदार याचा या प्रकरणात सहभाग असल्याचा कोणताही सबळ पुरावा कोर्टात तपासी अधिकारी सादर करू शकले नाही ही बाब मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश बरालिया यांच्या समोर ॲड.महेश तवले आणि ॲड.संजय दुशिंग यांनी मांडली.न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर बाबासाहेब केदार यांचे नाव खटल्यातून वगळण्याचे आदेश दिले  आहेत.

या प्रकरणात आरोपीच्यावतीने ॲड.महेश तवले,ॲड.संजय दुशिंग,ॲड.सागर वाव्हळ,ॲड.विक्रम शिंदे,ॲड.संजय वाल्हेकर,ॲड.अभिषेक बोराटे यांसह ऑफिस सहकाऱ्यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top