नगरमध्ये पहिलेच खेळाडूंसाठी त्यांना करिअर करण्याच्या स्पोर्ट्स मध्ये मार्गदर्शन आणि गुणवत्ता वाढीसाठी खिस्तीज जिमचे SYNC हायपरफॉर्मन्स सेंटर आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग.
नगर, प्रतिनिधी.(23.डिसेंबर.2023.) : भारत श्री शशिकांत खिस्ती यांच्या SYNC हायपरफॉर्मन्स सेंटर आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग या नूतन दालनाचा शुभारंभ गुरुवार 28 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
1992 साली नगरकरांसाठी भारत श्री शशिकांत खिस्ती यांनी खिस्तीज हेल्थ क्लब या नावाने नगरकरांसाठी पहिली जिम सुरू केली होती. गेल्या 30 वर्षांपासून नगरकरांनी खिस्तीज हेल्थ क्लबला भरभरून प्रतिसाद दिला आणि या जिम मधून भरपूर खेळाडू तयार होऊन गेलेत.
आता आम्ही खेळाडूंना त्यांच्या स्पोर्ट्समध्ये खास मार्गदर्शन मिळावे आणि खेळाडूंची त्यांच्या खेळामधील गुणवत्ता वाढावी यासाठी आम्ही नगरमध्ये पहिलेच SYNC हायपरफॉरर्मन्स सेंटरची सुरुवात करत आहोत.यामुळे पुणे - मुंबई सारख्या शहरात खेळाडूंना जाण्याची गरज नाही.या सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या स्पोर्ट्सची वैज्ञानिक पद्धतीने तयारी करून घेण्यात येईल. यामुळे खेळाडूंची त्यांच्या खेळातील गुणवत्ता वाढविण्यात मदत होईल, तसेच येथे खेळाडूंसाठी खास स्पोर्ट्स न्यूट्रिशनची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. येथे खेळाडूंना मार्गदर्शनासाठी स्पोर्ट्स परफॉरर्मन्स कोचेस आणि स्पोर्ट्स कन्सल्टंट उपलब्ध असणार आहेत. तसेच एखाद्या खेळाडूला त्याला आवड असणाऱ्या स्पोर्ट्समध्ये करिअर करायचे असेल तर त्यासाठी विशेष मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांसाठी / महिलांसाठी वजन वाढवणे - कमी करणे,फिटनेस यासाठी देखील मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे.
महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस असणार आहेत.
तरी नगर मधील जास्तीत जास्त खेळाडूंनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन भारत श्री शशिकांत खिस्ती यांनी केले आहे.