महानगरपालिकेने आस्थापना कर लागू केलेल्या ठरावा विरोधात नगर शहर भाजपाच्यावतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
नगर, प्रतिनिधी.(06.डिसेंबर.2023.) : अहमदनगर महानगरपालिकेने पारित केलेल्या आस्थापना कर लागू केलेल्या ठरावा विरोधात नगर शहर भाजपाने आज महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात आस्थापना कर आकारणीसाठी महापालिकेने मंजूर केलेल्या ठरावाचा संदर्भानुसार दोन प्रकार वगळता नगर मधील सर्व आस्थापनेवर व्यवसाय कर आकारणीसाठी आपण ठरावास मंजुरी दिली आहे त्यास आम्ही तीव्र विरोध व निषेध करीत आहोत.आपण सर्वसाधारण मंडळाने पारित केलेला ठराव त्वरित रद्द करावा अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अगोदरच नगरच्या जनतेला रस्ते, ड्रेनेज, पाणी, स्वच्छतागृहे या सर्व मोठया समस्या भेडसावत आहेत. नगर शहरात मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यामुळे नगरच्या संपूर्ण रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. नगरमध्ये स्वच्छता,स्वच्छतागृहे आणि पाणीपुरवठा या सेवांची सर्वात वाईट परिस्थिती आहे.कोणत्याही सुविधा उपलब्ध करून न देता तुम्ही अधिक कर आकारणीद्वारे कर वसुलीची अपेक्षा कसे करू शकता म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते आपणास निवेदनाद्वारे सूचित करीत आहोत की सदर कर रद्द करून जनतेला उपकृत करावे अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनास सामोरे जावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी मा.महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रामदास आंधळे, नितीन शेलार, प्रकाश सैंदर, अनिल सबलोक, महेश नामदे, बंटी डापसे, दत्ता गाडळकर, गोपाल वर्मा, प्रशांत मुथा, सुधीर मंगलारप, रविंद्र बाकलीवाल, अनिल निकम, बाळासाहेब खताडे,अनिल ढवन, पंडित वाघमारे, राजेश राजपूत, मयूर बोचघोळ, सुरेश लालबागे, भानुदास बनकर,मयूर ताठे,अरुण शिंदे,छाया राजपूत,कुसुम शेलार, लिला अगरवाल, रेणुका करंदीकर, सविता कोटा, प्रिया जानवे यांसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.