नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी मनेष साठे व अनिल कोठारी यांना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी.

Ahmednagar Breaking News
0

नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी मनेष साठे व अनिल कोठारी यांना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी.


नगर,प्रतिनिधी. (27. जानेवारी.2024.) : अहमदनगर शहरातील नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्या प्रकरणी  संचालकांपैकी मनेष साठे व अनिल कोठारी यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयासमोर आरोपींच्या विरुद्ध सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना असे निदर्शनास आणून दिले की कर्जदाराच्या खात्यातून संचालकांच्या खात्यात पैसे जमा झाले त्याबाबतच्या तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी त्यावर आरोपींच्या वकिलांनी सांगितले की संचालकांच्या खात्यात कुठलीही रक्कम न आल्याने न्यायालयीन कोठडी मिळावी असा युक्तिवाद करण्यात आला.दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मा.न्यायालयाने सदरील आरोपींना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

आरोपींच्या वतीने ॲड.महेश तवले ॲड.संजय दुशिंग व ॲड. संकेत ठाणगे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top