खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते 51 फुटी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे उद्घाटन.- ॲड.धनंजय जाधव.
नगर, प्रतिनिधी.(20.जानेवारी.2024.) : नगर शहरातील दिल्ली गेट भागात अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापने निमित्त प्रभू श्रीरामांची भव्य 51 फुटी प्रतिमा उभारण्यात आली आहे.या प्रतिमेचे नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी सायं.6:00. वाजता उद्घाटन करण्यात येईल असे ॲड. धनंजय जाधव यांनी सांगितले. या दिवशी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून प्रभागातील नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी विविध मनमोहक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार असून साऊंड लावून त्यावर प्रभू श्रीरामांचे गाणे वाजवण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजक श्री.सिद्धेश्वर तरुण मंडळ, जंगुभाई तालीम ट्रस्ट, श्री.साई द्वारका सेवा ट्रस्ट,श्री.सिद्धेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आणि सकल हिंदू समाज -अहिल्यानगर हे आहेत.