'सकाळ'चे बातमीदार,छायाचित्रकार दत्ता इंगळे यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर.

Ahmednagar Breaking News
0

'सकाळ'चे बातमीदार,छायाचित्रकार दत्ता इंगळे यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर.


नगर, प्रतिनिधी. (04. जानेवारी.2024.) : नगर मधील सकाळ पेपरचे बातमीदार, छायाचित्रकार दत्ता इंगळे यांना नाशिक येथील श्री.कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने कै. कृष्णराव कोठावळे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा कृष्णराव कोठावळे पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवार 5 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधत नाशिक येथील जुना आग्रा रस्त्यावरील कालिका मंदिर सभागृहात या पत्रकारिता पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती ट्रस्ट चे सरचिटणीस डॉ.प्रतापराव कोठावळे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top