प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त श्रीराम मंदिर,दसरे नगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन.
नगर,प्रतिनिधी.(23.जानेवारी.2024.) : अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त श्रीराम मंदिर,दसरे नगर येथे सकाळी श्रींचा अभिषेक करून विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिराचा कळस पूजन करून सामूहिक श्रीराम कथा स्तोत्र व हनुमान चालीसा पठण करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली. सायंकाळी परिसरातील महिलांनी भव्य दीपोत्सव करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. रात्री आठ वाजता मंदिरात महाआरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दसरे नगर परिसरासह सावेडी उपनगरातील नागरिक, महिला, लहान मोठ्या थोरांनी कार्यक्रमासह महाप्रसादाचा लाभ घेतला.
सदरील कार्यक्रमासाठी स्वराज्य प्रतिष्ठान,किशोर वाणे,अजित शहाणे, कृष्णा नरोडे, राजेंद्र गिते, योगेश सरोदे, शेखर बनकर,संतोष पेट्टा, कुणाल वाणे, सारंग शहाणे,सागर बनकर,मयूर सूर्यपुजारी,प्रसाद यंगलदास,रवी मुळे,लखन कोक्कुल,अंशुमन वाणे,तेजस लोढा,किरण तांबे,भाऊसाहेब उल्ल्हारे,अभिमन्यू नरोडे,अंजली शहाणे,मयुरी वाणे,वर्षा नरोडे, पूजा शहाणे यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.