श्री.गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री.गजानन महाराज मंदिरात पारायण.

Ahmednagar Breaking News
0

श्री.गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री.गजानन महाराज मंदिरात तीन दिवसांचे पारायण.


नगर,प्रतिनिधी. (27.फेब्रुवारी.2024.) : श्री.गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री.गजानन महाराज मंदिरात तीन दिवसांचे पारायण करण्यात येणार आहे. बुधवार दि 28 फेब्रुवारी ते शुक्रवार दि.01 मार्च 2024 पर्यंत दररोज पारायणाची सुरुवात सकाळी.11:00 ते दुपारी.01:00 वाजेपर्यंत असणार आहे. तरी ज्या भाविकांना पारायणास बसायचे असेल त्यांनी मंदिरात वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री.गजानन महाराज प्रकट दिन सोहळा रविवार दि 3 मार्च 2024 रोजी संपन्न होणार आहे. पहाटे 6:00 वाजता मूर्तीस लघुरुद्र अभिषेक करण्यात येईल. तरी परिसरातील ज्या भाविकांना लघुरुद्र अभिषेक करण्याची इच्छा असेल त्यांनी पहाटे 6:00 वाजता श्री.गजानन महाराज मंदिरात उपस्थित राहावे.

 श्री.गजानन महाराजांची पालखी मिरवणूक रविवार दि 3 मार्च 2024 रोजी सकाळी 9:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत नवले नगर परिसरातून काढण्यात येईल. तरी परिसरातील महिलांनी आपापल्या घराच्या दरवाजासमोर सडा,रांगोळ्या काढण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले आहे.दुपारी ठीक 12:00 वाजता महाआरतीला सुरुवात करण्यात येईल आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा.

                           भक्तिरंग प्रस्तुत.

भजन संध्या रविवार दि 3 मार्च 2024 रोजी संध्या 6:00 वाजता.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top