अपघातात गंभीर जखमी रुग्णाचा साईदिपच्या डॉक्टरांनी वाचवला जीव.

Ahmednagar Breaking News
0

अपघातात गंभीर जखमी रुग्णाचा साईदिपच्या डॉक्टरांनी वाचवला जीव.

 


नगर, प्रतिनिधी.(11.मार्च.2024.) : नेवासा तालुक्यातील चांदा येथील व्यक्तीचा अपघात झाला होता . त्यात त्याला गंभीर इजा झाली आणि तशातच रुग्ण बेशूध्द होता.मात्र नगरच्या साईदिप हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत त्या रुग्णाचा जीव वाचवला. रुग्णाच्या नातेवाईकांनाही आनंद झाला.त्यांनी साईदिपमध्ये येऊन तेथील डॉक्टरांचा सन्मान करत त्यांचे आभार मानले .

कोव्हीड काळात साऱ्या जगाने डॉक्टर्सना भुतलावरील देव म्हणून पाहिले.तसाच काहीसा अनुभव गत आठवडयात आला. नेवासा तालुक्यातील चांदा येथील ज्ञानदेव नामदेव नागपूरे यांचा भिषण अपघात झाला होता .डोक्याला जबर मार लागल्याने ते जागेवरच बेशूध्द झाले.रक्तस्त्राव जास्त झाला होता नातेवाईकांनी त्यांना नगरच्या साईदिप हॉस्पीटलमध्ये दाखल केले,तेथील डॉ.राहूल धूत,डॉ.भूषण खर्से ,डॉ.रविद्र शेळके यांनी रुग्णावर तातडीने उपचार सुरू केले.नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला होता.डॉक्टरांचे अथक प्रयत्न परमेश्वराची कृपा यामुळे सदर पेशंट शुध्दीवर आले.हळूहळू तब्येतीत सुधारणा होत गेली आणि अखेर आज सोमवार रोजी रुग्णाला डिस्चार्ज मिळणार असे कळल्यावर नातेवाईकांसह सर्वांनाच हायसे वाटले. डॉ.राहूल धूत,डॉ.भूषण खर्सै, डॉ.रविंद्र शेळके यांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचा चांदा ग्रामस्थ व नातेवाईकांच्या वतीने हॉस्पिटलमध्ये जाऊन सन्मान केला. यावेळी पत्रकार अरूण सोनकर,संदिप नागपूरे,अनिरुद्ध डाके सह रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top