पोलीस प्रशासनाची ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून मिरवणुकीवर बारीक नजर....

Ahmednagar Breaking News
0

नगर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणूकीवर पोलीस प्रशासनाची ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नजर....

नगर‌, प्रतिनिधी. (14. एप्रिल.2024.) : नगर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीवर ड्रोन कॅमे-याच्या माध्यमातून कोतवाली पोलिसांची प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे.नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे‌. मिरवणुकीतील प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांसह उपस्थितांवर पोलिस प्रशासनाची ड्रोनकॅमे-यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top