असाही एक डॉक्टर....

Ahmednagar Breaking News
0

समाजाप्रती आपण देखील काही देऊ लागतो याचा तंतोतंत विचार करणारे डॉ.सुमित नलावडे....

नगर, प्रतिनिधी. (15. एप्रिल.2024.) : दिवस होता रविवारचा, संध्याकाळच्या वेळेला प्रेमदान चौकातून डॉ.सुमित नलावडे जात असताना एका भिल्ल समाजाच्या फुगे विक्रेत्यावर त्यांची नजर पडली. फुगे विकताना त्याच काठीची झोळी करून त्यात त्यांच्या एका चार ते पाच महिन्याच्या बाळाला झोपी लावलेले होते.हे दृश्य पाहून डॉ.सुमित यांना राहवले नाही त्यांनी त्या फुगेवाल्या जोडीला विचारले असता त्या माऊलीने आपले अश्रू लपवित सांगितले की तीन दिवसांपासून बाळ आजारी असून खूप ताप आहे,आजही रविवारचा दिवस असल्याने बाळाला कोणत्याही डॉक्टरांकडे घेऊन जाता आले नाही. त्यावर डॉ. सुमित यांनी स्वत: पाहिले असता खरोखरच त्या बाळाचे शरीर खूपच तापलेले होते. हे पाहून डॉ. सुमित यांना काही रहावले नाही.त्यांनी लगेचच जवळच असलेल्या त्यांच्या मित्राच्या खेडकर मेडीकल मधून काही औषधे घेतली व त्या बाळाच्या आईकडे दिली.डॉ.सुमित यांनी औषधं दिल्याने डोळे भरून आलेल्या त्या माता-पित्याने मोठ्या मनाने काही फुगे भेट म्हणून घरी घेवून जाण्याचा आग्रह केला, परंतु ते न घेताच त्यांच्या डोळ्यातले समाधान पाहून डॉ.सुमित यांचा आजचा दिवस सार्थ झाल्याचे भाग्य मात्र नक्कीच त्यांना लाभले…                                     

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top