प्रथितयश गायक गिरीराज जाधव यांचा "दिल की कलम से " बॉलीवूड गीतांचा कार्यक्रम.
नगर, प्रतिनिधी. (26. एप्रिल.2024.) : नगर येथील प्रथितयश गायक गिरीराज जाधव, पुणे येथील प्रसिद्ध गायिका कल्याणी देशपांडे आणि टीम यांचा येत्या रविवारी 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता माऊली सभागृह इथे ' दिल की क़लम से ' हा बॉलिवूड गीतांचा एक आगळावेगळा कार्यक्रम होत आहे.
अजय साळवे,ललित भूमकर, सार्थक डावरे, नरेंद्र साळवे, हार्दिक रावल, ओमकार साळवे आणि सुधीर सोनावणे या सर्व दर्जेदार कलाकारांसमवेत हा कार्यक्रम पार पडत आहे.
कार्यक्रमाचे नियोजन प्रसिद्ध कवयित्री सिद्धी ढोके यांनी केले आहे तर निवेदन मुंबई येथील सेलिब्रिटी अँकर धनश्री दामले करणार आहेत. सोबतच आपल्या शहरातील नावाजलेले ग्राफिक डिझाईनर ज्ञानेश शिंदे यांनी या कार्यक्रमाची संपूर्ण बांधणी केली आहे.
शिर्डी येथील हॉटेल विराज, जोशी हॉस्पिटल, अर्थ रेस्टॉरंट , बांगडीवाला युनीट्री हे कार्यक्रासाठी चे आदरणीय स्पॉन्सर्स आहेत तसेच अहमदनगर स्टोरीज,हॉटेल रोज गोल्ड , चंगेडिया आऊटडोअर, रेडिओ ऑरेंज, चिंतामणी आर्ट्स, रेनड्रॉप फोटोग्राफी, सुख योगा आणि द पर्पल डेव्हलपर्स यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे.
या विनामूल्य अशा अनोख्या सागितिक मेजवानीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती गिरीराज जाधव यांनी केली आहे.