सरगम गीतमाला तर्फे शनिवारी हिंदी मराठी गाण्यांची मैफील...

Ahmednagar Breaking News
0

सरगम गीतमालातर्फे शनिवार, 18 मे रोजी रावसाहेब पटवर्धन हॉल, समर्थ शाळेजवळ,सावेडी,अहमदनगर येथे सायंकाळी ५ वाजता हिंदी मराठी गाण्यांची मैफिल.


नगर, प्रतिनिधी. (17. मे 2024.) : सरगम गीतमाला परिवारातर्फे सुमधुर हिंदी मराठी गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.सदर कार्यक्रम विनामूल्य असून नगर शहर व परिसरातील सर्व संगीत प्रेमींनी,श्रोत्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून जुन्या नवीन सुमधुर हिंदी मराठी गीतांचा आस्वाद घ्यावा.सरगम गीतमालेचे हे दुसरे पुष्प आहे.आयोजकांच्यावतीने सर्व नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम सातत्याने चालू आहे. कोरोना काळात शहर परिसरातील बऱ्याचशा बाथरूम सिंगर्सला आपण गाऊ शकतो ही अनुभूती झाली आणि अश्याच गायकांना एकत्रित करून सरगम गीतमाला उदयास आल्याचे महेश घावटे यांनी सांगितले.

वास्तविक आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला थोडा मानसिक आराम हवा असतो.आपल्या आवडीची गाणी गाणे किंवा ऐकण्यामधून ही गोष्ट सहजसाध्य होत असते.संगीत आपल्या रक्तातील तणाव संप्रेरकांची पातळी कमी करून आपले हृदय सतत निरोगी ठेवत असते.जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुमच्यासाठी सुमधूर संगीत ऐकणे फायदेशीर ठरू शकते.संगीत आपल्या मेंदूतील डोपामाईन संप्रेरकाची पातळी वाढवून चिंता आणि नैराश्य दूर करण्यास मदत करते.

गाणी म्हणताना किंवा ऐकताना बायोकेमिकल स्ट्रेस रिड्युसर सुरू होऊन तणाव झपाट्याने कमी होतो.जेव्हा तुम्ही नैराश्याच्या गर्तेत बुडालेले असता तेव्हा आपल्या आवडीचे संगीत जरूर ऐकायलाच हवे.सुरेल वा तुमच्या आवडीच्या संगीताने तुमचे मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होत असते त्यामुळे तुमचा कंटाळवाणा दिवस देखील छान जातो.

अल्झायमर रोग किंवा स्मृतिभ्रंश यावर कोणताही इलाज नाही परंतु संगीत थेरपी त्याच्या काही लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी दर्शविले गेले आहे. म्युझिक थेरपी अस्वस्थ रुग्णाला आराम देऊ शकते, एखाद्याचा मूड सुधारू शकते आणि रुग्णांमध्ये संवाद मुक्त करू शकते.

तीव्र स्वरूपाच्या शारीरिक वेदना होत असल्यास तणावाची पातळी कमी करून आणि मेंदूमध्ये प्रवेश करणाऱ्या वेदना संकेतांना एक मजबूत स्पर्धात्मक उत्तेजना प्रदान करून,संगीत थेरपी वेदना व्यवस्थापनात मदत करू शकते.संगीत एक प्रभावी वेदनाशामकदेखील आहे.जेवताना पार्श्वभूमीत मऊ संगीत वाजवल्याने (आणि दिवे मंद करणे) लोकांना जेवताना मंद होण्यास मदत होते आणि शेवटी जेवणामध्ये  आपण कमी,लिमिटेड अन्न घेतो त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते.

संगीताधील टॉप वर्कआउट ट्रॅक ऐकल्याने शारीरिक कार्यक्षमता वाढू शकते आणि कठीण व्यायाम सत्रात आपली सहनशक्ती झपाट्याने वाढते.संगीताच्या तालावर व्यायाम किंवा नृत्य केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते.अश्याप्रकारे आपल्या दैनंदिन आयुष्यात संगीतामुळे असंख्य सकारात्मक फायदे होतात.

सदर कार्यक्रमात महेश घावटे, मोनाली बोरुडे,अजित रोकडे,विद्या तन्वर,डॉ विवेकानंद कंगे,प्रा दीपा भालेराव, भानुदास महानूर, डॉ सुरेखा घोडके,प्रा डॉ अविनाश मंचरकर,सुनीता धर्माधिकारी,डॉ दमण काशीद,डॉ गायत्री कुलकर्णी,डॉ राहुल पंडीत,शुभांगी ओहोळ,सचिन चंदनशिवे,अर्जुन चौरे,चारुदत्त ससाणे,प्रफुल्ल सोनवणे(जळगाव),रोनीत सुखधान,सुनील भंडारी,राजेंद्र शहाणे,आदिनाथ अन्नदाते आदी गायक कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

कार्यक्रमास उपस्थित श्रोत्यांसाठी एक लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला असून चहापाणी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक कमिटीच्या वतीने डॉ. कंगे,भानुदास महानूर,चारुदत्त ससाणे, डॉ अविनाश मंचरकर हे प्रयत्नशील आहेत.कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे.सर्व रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच ज्या कलाकारांना इथून पुढील कार्यक्रमात सहभागी होण्याची ईच्छा असेल त्यांनी महेश घावटे यांच्याशी 7350881515 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top