टायनी टॉट्स नर्सरी स्कूलच्या संचालिका मीरा पाटील आणि मानसिंग पाटील यांनी सुरु केलेल्या नॉर्थस्टार ग्लोबल स्कूलमध्ये सैनिक प्रशिक्षणावर (NDA)भर.....
नगर,प्रतिनिधी.(05.मे.2024.) : टायनी टॉट्स नर्सरी स्कूलच्या संचालिका मीरा पाटील आणि मानसिंग पाटील (Ex.इंडियन एअर फोर्स एज्युकेशन ऑफिसर.) यांनी सुरु केलेल्या नॉर्थस्टार ग्लोबल स्कूलमध्ये सैनिक प्रशिक्षणावर (NDA)भर देऊन स्कूलला उत्तुंग यशाकडे घेऊन जाण्याचा संकल्प
केला आहे. या दोन्ही व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रातील 47 वर्षांचा अनुभव आहे. या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासह शारीरिक, बौद्धिक,मानसिक,भावनिक विकासावरही भर देण्यात येईल. विशेष म्हणजे या स्कूलमध्ये JEE आणि NEET सह सैनिकी प्रशिक्षणावर (NDA) विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या स्कूल मधून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
नगर शहरातील प्रथमच सैनिक प्रशिक्षणावर आधारित हे पहिलेच खाजगी CBSE स्कूल आहे. या स्कूलमध्ये विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडून NDA ची पूर्व तयारी करून घेण्यात येणार आहे. नगर शहरातील CBSE चे सर्वात कमी फी असलेले स्कूल आहे. हे स्कूल 15 एकर जागेत भव्य इमारत असलेले, मोकळी व स्वच्छ हवामान असलेल्या ठिकाणी आहे.सावेडी उपनगरापासून फक्त 9. किमी अंतर असलेले आणि या स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी खास स्कूल बसेसची सोय असणार आहे. तरी नगर मधील इच्छुक नागरिकांनी आपल्या पाल्याचा विकास व्हावा यासाठी नॉर्थस्टार ग्लोबल स्कूलमध्ये ऍडमिशन घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
नॉर्थस्टार ग्लोबल स्कूल हे टायनी टॉट्सच्या संचालिका मीरा पाटील आणि मानसिंग पाटील यांनी चालविण्यास घेतलेले असून त्यांचे टायनी टॉट्स नर्सरी स्कूल,अष्टविनायक कॉलनी, पाईपलाईन रोड येथे कायमस्वरूपी चालू असणार आहे.