मानसग्रामने केले 300 मनोयात्रींचे कौटुंबिक पुनर्वसन,बहुविध मानसिक आरोग्य सेवांच्या विस्ताराची योजना.
नगर,( 29 जुलै 2024.) : मानसिक आजारावरील मानसग्राम या बहुउद्देशीय आणि समग्र प्रकल्पाने मागील 4 वर्षात रस्त्यांवर बेवारस अवस्थेत सापडलेल्या 300 मनोयात्रींचे भारतासह नेपाळ - बांगलादेश या शेजारी देशात यशस्वी कौटुंबिक पुनर्वसन केले.
चालू वर्षात मनोबल व्यसनमुक्ती केंद्रासह अहमदनगरइन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ ( AIPH) आदी बहुविध मानसिक आरोग्य सेवांच्या विस्ताराची योजना कार्यान्वित होणार असल्याची माहिती मानसोपचार तज्ञ डॉक्टर नीरज करंदीकर यांनी दिली.मानसिक आरोग्यावरील प्रबोधन आणि मानसग्राम प्रकल्पाच्या बांधकामासाठी निधी संकलनार्थ 'सात रंग के सपने' या संगीत मैफलीचे आयोजन स्नेहधारा फाउंडेशनतर्फे माऊली सभागृहात काल करण्यात आले होते.
पुणे येथील निषादसंस्थेचे संस्थापक आणि मूळ नगरकर असलेले प्रख्यात गायक चंद्रशेखर महामुनी आणि सहकलाकारांनी सामाजिक जाणीवेतून 1980पूर्वीच्या सदाबहार सुमधुर हिंदी गाण्यांची मैफल सादर केली. राष्ट्रीय किर्तीचे मूळ नगरकर असलेले डॉ.अमित जयंत त्रिभुवन यांनी यामैफलीचे सूत्रसंचालन केले. यावेळीस्नेहालयाच्या प्रेरणेतून कार्यरत शिवांजली हेल्पिंग हॅन्ड या पुणे परिसरातीलसंस्थेचा परिचय करून देण्यात आला. अमरावती जिल्ह्यात स्नेहालयाच्यास्नेहाधार महिला हेल्पलाइनच्या धर्तीवर महिला आणि बाल विकासाचे काम करणाऱ्यासमर्पण या संस्थेला शीवांजली संस्थेने पाच लाख रुपयांची मदत मुलींच्या सुरक्षागृहाच्या बांधकामासाठी देण्यात आला. शिवांजली संस्थेचे सागर मिसाळ आणि टीमला यावेळी सन्मानित करण्यात आले.यावेळी आ. संग्राम जगताप, अण्णासाहेब पाटीलआर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार नरेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थितहोते.माजी नगरसेवक सुनील काळे यांनी यावेळी मोठा आर्थिक सहयोग मानसग्राम बांधकामाला दिला. मानसग्राम प्रकल्पाने मानसिकआरोग्यसंबंधी घेतलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील वक्तृत्व, निबंध आणि पोस्टर स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ.करंदीकर यांनी सांगितले की,मानसग्राम प्रकल्प इसळक गाव (ता.जि.अहमदनगर) येथे वर्ष 2020 मध्ये सुरू करण्यातआला. श्रद्धा रिहबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेचे डॉ.भरत वाटवाणी, नगरचे करंदीकर मानसोपचार रुग्णालय आणि स्नेहालय या संस्थांनी एकत्र येऊन सुरू केला. भारतातील ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी मानसोपचाराची औषधे मिळत नाहीत.त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांना मानसिक आजाराची औषधे या उपक्रमाद्वारे घरपोहोच मोफत पुरविली जातात,हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असल्याचे डॉ. नीरज यांनी नमूद केले. स्नेहधारा संस्थेचे संस्थापक भूपेंद्ररासने यांनी सांगितले की, मानसग्राम मध्ये डॉ. जयंत करंदीकर स्मृती मनोबल व्यसनमुक्ती केंद्र, मोफत समुपदेशन आणिमानसिक आरोग्य मार्गदर्शन, REBT - CBT - माईंड फुलनेस असे मानसिकआरोग्याच्या संदर्भातील मार्गदर्शक उपक्रम जातात.मानसिक निरोगी गाव, या मोहिमे अंतर्गत क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट सौ.दीप्ती करंदीकर आणि टीम नगर शहर आणि तालुक्यात प्रबोधन संवादाचे नियमित स्वरूपात आयोजन करतात. स्नेहधारा संस्थेने यापुढे या प्रकल्पासाठी10 वर्ष सातत्याने योगदान देण्याचे ठरविले आहे. आ.जगताप यांनी नमूद केले की, सामाजिक विकासाच्या उपक्रमांबाबत अहमदनगर शहर हे स्नेहालय मुळे भारतात नामांकित झाले आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या मानसिक आरोग्याचा मार्गदर्शक,या पुस्तकाचा सीमा उपळेकर यांनी केलेला अनुवाद मानसग्रामने 3 वर्षांपुर्वी प्रसिद्ध केला.त्यामुळे मानसोपचार तज्ञ उपलब्ध नसतो तेथे मानसिक आजाराचे निदान आणि त्यावरील प्राथमिक उपचारांचे मार्गदर्शन याद्वारे प्रशिक्षित परिचारक - परिचारिका तसेच या क्षेत्रातील अभ्यासकयांना राज्य स्तरावर दिले जाते. या कामामुळे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातमहाराष्ट्र पुढील दशकात अग्रणी झालेला दिसेल, असे आ.जगताप म्हणाले.
माजी आमदार नरेन्द्र पाटील म्हणाले की, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांना मानसग्राम प्रकल्प दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करतो.मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य संस्थांना सन्मानित आणिप्रोत्साहित करण्याची स्नेहालयची दृष्टी या संस्थेचे वेगळेपण दर्शविते.ग्रामीण कष्टकरी ,शेतकरी, महिला आणि युवक यांच्या मानसिक आरोग्यासाठी व्यापक लोक चळवळीची आवश्यकताआहे असे श्री. पाटील म्हणाले. इसळक येथील स्नेहमनोयात्री केंद्रात सध्या 35 रुग्ण आहेत . प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर येथे 250 रुग्णांच्या निवास आणि उपचार यांची सोय होणार असल्याचे समन्वयक रमाकांत डोड्डी यांनी आभार व्यक्त करताना नमूद केले.
स्नेहधाराच्या या उपक्रमासाठी संकेत होशिंग, नारायण मंगलारप, क्षितिजा हडप, स्नेहालयचे श्रीमती जया जोगदंड ,डॉ.प्रीती भोंबे,प्रवीण मुत्याल, वृषाली गोखले,दीपक पापडेजा, गीता कौर ,सपना असावा ,रूपाली मनोत, संजय गुगळे,रेडिओ नगर 90.4 एफएम चे संचालक भूषण देशमुख ,संतोष धर्माधिकारी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.तनिष्का मंगलारप आणि प्रणाली धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.
मनोयात्रींना उपचारांची मदत हवी असेल तर 9011011006 येथे संपर्काचे आवाहन संयोजकांनी यावेळी केले.