असोसिएशनने 2022 मध्ये महारक्तदान शिबीर घेऊन विक्रमी रक्त संकलन केले होते,यावर्षी देखील असाच संकल्प करण्यात आला आहे.- आमदार संग्राम जगताप.
नगर, प्रतिनिधी. (15.जुलै. 2024.) : नगर शहरातील मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय महारक्तदान शिबिर मंगळवार दि.16 जुलै 2024 रोजी सकाळी 7:00 ते रात्री 8:00 या वेळेत न्यू टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे होणार आहे. या रक्तदान शिबिरासाठी दहा रक्तपेढ्यांची टीम सहकार्य करणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप,अहमदनगर जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी दिली.या शिबिरात विक्रमी रक्त पिशव्या संकलन करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले,असोसिएशनने 2022 मध्ये महारक्तदान शिबिर घेऊन विक्रमी रक्त संकलन केले होते. यावर्षी देखील असाच संकल्प करण्यात आला आहे. यामुळे नगरचे महारक्तदान शिबिर महाराष्ट्राच्या नकाशावर येईल याची खात्री आहे.
रक्तदान चळवळ नगरकरांनी पुढे नेलेली आहे,त्यामुळे आताच्या रक्तदान शिबिरातही नगरकरांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले.
यावेळी अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने नगरकरांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.