सावेडी सर्कल व तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात.

Ahmednagar Breaking News
0

सावेडी सर्कल व तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात.लाचेची केली मागणी,सापळा रचून झाली कारवाई....


नगर, प्रतिनिधी. (26.जुलै. 2024.) : युनिट - अहमदनगर

तक्रारदार.-  पुरुष, वय- 54 वर्ष. रा.अहमदनगर

आलोसे- 1) सागर एकनाथ भापकर, तलाठी सजा सावेडी, ता.नगर, जिल्हा अहमदनगर

2) शैलजा राजाभाऊ देवकाते, मंडळ अधिकारी सावेडी, ता. नगर, जिल्हा अहमदनगर

लाचेची मागणी.- 44,000/- तडजोडीअंती 40,000/- रुपये

हस्तगत रक्कम- निरंक.

लाचेची मागणी दिनांक- दि.19/03/2024

लाच स्विकारली- निरंक.

तक्रार:- यातील तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या संयुक्त नावे सावेडी, अहमदनगर येथे 18000 चौरस फूटचा प्लॉट आहे. सदर प्लॉटचे अहमदनगर महानगरपालिका यांचेकडील शासकीय रेखांकन करून सदर प्लॉटचे बांधकाम करण्याकरीता 22 स्वतंत्र उपविभागनी केलेली आहे. लोकसेवक भापकर, तलाठी सजा सावेडी यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या 22 प्लॉटच्या फेरफार नोंदी ऑनलाइन अपलोड केल्याच्या मोबदल्यात 44,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 40,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व लोकसेविका देवकाते, मंडळ अधिकारी सावेडी यांनी तक्रारदार यांच्याकडून सदर प्लॉटच्या फेरफार नोंदी मंजूर करण्यासाठी 44,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य करून लोकसेवक भापकर, तलाठी यांच्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे 22 प्लॉटचे 11,000/- रुपये लाचेची मागणी केली म्हणुन गुन्हा.

आलोसे यांचे सक्षम अधिकारी- 

मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर.

हॅश व्हॅल्यू घेण्यात आली  आहे.

सापळा अधिकारी.

श्री.शरद गोर्डे, तत्कालीन पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर मोबा.नं. 7719044322

सापळा पर्यवेक्षण अधिकारी.

श्री.प्रविण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर मो. क्र.7972547202

दाखल व तपास अधिकारी:श्रीमती छाया देवरे, पोलीस निरीक्षक,ला. प्र.वि. अहमदनगर

8788215086

सापळा पथक.        

पो.कॉ. सचिन सुद्रुक, पो.कॉ. बाबासाहेब कराड, चालक पो.हे.कॉ.हारून शेख

मार्गदर्शक - मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक मो.न. 9371957391 

मा.श्री माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. मो नं 9404333049

सहकार्य. श्री.स्वप्नील राजपूत, वाचक, पोलीस निरीक्षक,  ला.प्र.वि. नाशिक मो.नं  9403234142

---------------------------

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो,अहमदनगर. 

@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677

@ टोल फ्रि क्रं. 1064

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top