मा.नगरसेवक योगीराज गाडे व थोरात आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने नगरकरांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर....
नगर, प्रतिनिधी. (30.जुलै. 2024.) : मा.नगरसेवक योगीराज गाडे व थोरात आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व नंबरचे चष्मा वाटप होणार आहे."आम्ही तुमच्या दृष्टीसाठी घेऊन आलो आहोत मोफत नेत्र तपासणी शिबिर "या शिबिरात मोफत नेत्र तपासणी,नंबरचे चष्मा वाटप, अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असून हा कार्यक्रम बुधवार 31 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सिंधी हॉल, तारकपूर, अहिल्यानगर येथे डॉक्टर रोहित थोरात व ऑप्टोमेट्रीस्ट शुभम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.तरी नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती मा.नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आहे.