एन.डी.कासार शैक्षणिक संकुलामध्ये पॉलिटेक्निक कॉलेजला मान्यता...

Ahmednagar Breaking News
0

वाळकी येथील एन.डी.कासार शैक्षणिक संकुलामध्ये  पॉलिटेक्निक कॉलेजला मान्यता...

नगर, (वाळकी,ता.नगर.) (24 ऑगस्ट.2024.) : नगर तालुक्यातील वाळकी गावात असलेल्या एन.डी.कासार शैक्षणिक संकुलामध्ये एन.डी.कासारं इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या नावाने पॉलिटेक्निक कॉलेजला परवानगी मिळाली असून त्याबाबत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद त्याचबरोबर महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ या सर्वांची अधिकृतरित्या परवानगी मिळालेली आहे. या महाविद्यालयाचा कोड ५५४३ असा असून या महाविद्यालयात एकूण पाच कोर्सला मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये कम्प्युटर इंजीनियरिंग ६० सीट, कम्प्युटर सायन्स ६० सीट,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ६० सीट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ६० सीट, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ६० सीट असे एकूण ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत, तेव्हा जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय महाविद्यालयाचे तसेच धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन.डी.कासार यांनी तसेच संस्थेचे सचिव विक्रम कासार त्याचबरोबर संस्थेचे समन्वयक प्राध्यापक सिताराम जाधव यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

वाळकी सारख्या ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर एन.डी.कासार शैक्षणिक संकुलामध्ये बी फार्मसी, डी फार्मसी बरोबरच आता इंजीनियरिंग पॉलीटेक्निक अशा विविध प्रकारच्या शिक्षणाची सोय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाल्यामुळे परिसरातून या शैक्षणिक संकुलाचे कौतुक होत असल्याची माहिती संस्थेचे सचिव विक्रम कासार यांनी दिली.

    🟣 संपर्क.विक्रम कासार.9850111150.🟣

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top