आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते "ती " च्या गणपती बाप्पाची आरती....
नगर, प्रतिनिधी.(13.सप्टेंबर.2024.) : नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नगर शहरातील माणिक नगर भागातील महिलांनी एकत्र येऊन स्थापना केलेल्या 'तीं 'च्या गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी मा. नगरसेवक गणेश भोसले ,प्रकाश भागानगरे, डॉ.विजय भंडारी, डॉ.आशिष भंडारी, विशाल पवार, वैभव ढाकणे, यांसह महिला मंडळाच्या आश्लेषा पवार,सारिका कोठारी,अमृता गट,पायल भंडारी, रूपाली शेळके, वृषाली महाले, दीप्ती गांधी, निकिता कोठारी यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.
या मंडळाची खासियत म्हणजे या भागातील महिलांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे या मंडळात दररोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी महिलांनी उत्साहात केलेल्या सार्वजनिक उपक्रमाबद्दल कौतुक करून अभिनंदन केले.