बहुचर्चित शेंडी येथील अपहरण करुन खुन केल्या प्रकरणात आरोपीचा जामिन मंजुर.
नगर, प्रतिनिधी. (05.सप्टेंबर. 2024.) : थोडक्यात हकीगत अशी कि,मयत हनुमंत आवारे याचे आरोपींनी मिळून संगनमताने मौजे इमामपुर येथून अपहरण केले व तदनंतर त्याला मौजे शेंडी गावचे परीसरातील कराळे यांचे शेतातील मक्याचे पिकाजवळ बोलावून तेथे त्यास मारहाण करुन त्याला विजेचा करंट देवून त्याचा खुन केला असल्या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या गुन्ह्याचे तपासामध्ये संशयीत आरोपी म्हणून दिपक भाऊसाहेब साळवे रा. शिंगवे नाईक ता. जि. अहमदनगर यांस अटक केलेली होती. व तदनंतर सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होवून मा.जिल्हा व सत्र न्यायालयात सेशन केस नंबर 177/2024 ची दाखल झाली.
सदरच्या केसमध्ये आरोपी हा जेलमध्ये असतांना, आरोपीचे वतीने अॅड. सुबोध सु.जाधव, अहमदनगर यांनी मा. न्यायालयात नियमित जामिन मिळणेकरीता अर्ज दाखल केलेला होता. सदरच्या अर्जात अॅड. सुबोध सु.जाधव यांनी केलेला युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्य धरुन, आरोपीचा जामिन अर्ज अहमदनगर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीयुत एम आर मांडवगडे साहेब यांनी दि.4/9/2024 रोजी मंजुर केलेला आहे.