शिवशंकर सोशल फाउंडेशन आणि शंकरलीला इन्फ्रास्ट्रक्चर्स आयोजित नवरात्री दांडिया 2.0 चे आयोजन.

Ahmednagar Breaking News
0

नगरकरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नवरात्री दांडिया 2.0 चे शानदार आयोजन....







नगर, प्रतिनिधी. (10.ऑक्टोबर. 2024.) : शिवशंकर सोशल फाउंडेशन आणि शंकरलीला इन्फ्रास्ट्रक्चर्स आयोजित नवरात्री दांडिया 2.0 चे आयोजन नगर - मनमाड रोड वरील बंधन लॉन्स येथे 11 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 06:00 वाजता करण्यात आल्याची माहिती उद्योजक अमित गटणे व करण भळगट यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मराठी चित्रपट अभिनेत्री प्रार्थना बेहेरे असून आलेल्या महिलांना व युवतींना प्रार्थना बेहेरे यांच्या सोबत दांड्या खेळण्याची संधी मिळणार आहे.

दांडिया खेळण्यासाठी सहभागी होणाऱ्यांना बेस्ट ड्रेपरी,बेस्ट कपल,बेस्ट ग्रुप आणि बेस्ट सेल्फी यामध्ये विविध भक्षिसांची लयलूट होणार आहे.

सामाजिक भान लक्षात ठेवून आयोजकांनी या कार्यक्रमात स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून नऊ नवदुर्गांचा सन्मानही ठेवला आहे. विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि आपलं नाव लौकिक कमावणाऱ्या महिलांचा यावेळी प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.

 या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना पास मिळण्यासाठी 

 🟠 कॅफे सायंतारा,गुलमोहर रोड.

 🟠 राज ऑप्टिकल्स,प्रोफेसर कॉलनी चौक.

 🟠 डी.एम.मुळे नवी पेठ.

 🟠 शुभम मोबाईल शॉप,टिळक रोड.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top