डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे संविधान दिन साजरा.
नगर, प्रतिनिधी. (30.नोव्हेंबर. 2024.) : डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, कृषी महाविद्यालय, विळदघाट, अहिल्यानगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी अध्यक्षीय मनोगतात भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, महत्त्व व इतिहास, भारतीय लोकशाही करता भारतीय संविधानाची आवश्यकता याबाबतचे मार्गदर्शन उपस्थितांना केले. तसेच यावेळी मुंबई येथे झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे यांनी केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. बी. राऊत, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. डी. एम. नलावडे, सहयोगी प्रा. डॉ. एच. एल. शिरसाठ तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. राऊत यांनी केले.