नेवासा तालुक्यातील बहुचर्चीत खुन प्रकरणातील आरोपीचा जामिन मंजुर, आरोपीतर्फे अॅड महेश तवले.....
नेवासा, प्रतिनिधी. (09 जानेवारी 2025.): दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या गळनिंब ता. नेवासा येथील प्रविण सुधाकर डहाळे यांच्या खुन प्रकरणातील गुन्हा रजि नंबर 1018/2023 नेवासा पोलिस स्टेशन मधील आरोपी नामे बंडू भिमराज साळवे रा.बाबुर्डी बेंद ता.जि.नगर आरोपी यास जामिन मंजुर झालेला आहे. सदर घटना अशी की, दि. 27ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 06:00 च्या सुमारास आरोपी नामे 1)शेखर अशोक उर्फ खंडू सतरकर 2)अशोक उर्फ खंडू किशोर सतरकर 3) दिपक सावंत 4) माऊली उर्फ अरुण दत्तात्रय गणगे,5) किशोर पटारे 6) जालिंदर बिरुटे वगैरे दोन तिन इसम यांचे विरुध्द गुन्हा दाखल झाला होता. सदरील आरोपी यांनी कोयते व तलवार या सारख्या धारदार हत्याराने अंगावर सपासप वार करुन व इतर आरोपींनी लोखंडी रॉड व दांडयाने मारहाण केली. अशा मजकूराची फिर्याद नेवासा पोलिस स्टेशनला दाखल झाली होती. त्यानंतर आरोपी नं.5 बंडू भिमराज साळवे यांने अॅड. महेश तवले यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड निखील ढोले पाटील याचे तर्फे जामिनासाठी मे.नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब यांचे समोर आरोपी यांचे वतीने जामिन अर्ज ठेवला होता सदरचा अर्जावर युक्तीवाद होवुन सदरचा अर्ज आरोपी यांच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी याची जामिनावर अटी व शर्तीसह जामिन मंजुर केलेला आहे. तरी आरोपी तर्फे अॅड. महेश तवले यांचे मार्गदर्शनाखाली अॅड. निखील ढोले पाटील यांनी कामकाज पाहिले.