महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे केंद्रीय राज्यमंत्री पै.मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वाडिया पार्क येथे सोमवारी होणार मैदानाचे भूमिपूजन.- आमदार संग्राम जगताप.
नगर,प्रतिनिधी.(11.जानेवारी.2025.) : नगर शहरात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानाचे भूमिपूजन वाडिया पार्क क्रीडा संकुलात सोमवार 13 जानेवारी रोजी सकाळी 11:00 वाजता केंद्रीय राज्यमंत्री पै.मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. रामदास तडस,कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे,सरचिटणीस हिंदकेसरी पै.योगेश दोडके,आमदार शिवाजीराव कर्डिले,माजी आमदार अरुण काका जगताप, पै.सचिन जगताप,आयोजक तथा अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप, उपाध्यक्ष पै.अर्जुन (देवा )शेळके,उपाध्यक्ष पै. रवींद्र वाघ, महाराष्ट्र केसरी पै.अशोक शिर्के,महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे,उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद,उपमहाराष्ट्र केसरी बापू थेटे,सचिव प्रा.डॉ.पै.संतोष भुजबळ,सहसचिव पै.प्रवीण घुले, खजिनदार पै.शिवाजी चव्हाण, उत्तर महाराष्ट्र केसरी पै. युवराज करंजुले,पै.शिवाजी कराळे,पै.उमेश भागानगरे,पै.पांडुरंग गुंजाळ,पै.नितीन काकडे,पै.शंकर खोसे,पै.प्रमोद गोडसे,पै.संदीप कावरे,पै.धनंजय खर्से, पै.अतुल कावळे,पै.मोहन गुंजाळ,पै. निलेश मदने,पै.संजयकाका शेळके,महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक,जिल्हा व राज्यभरातून आलेले सर्व मल्ल्ल आणि वस्ताद मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
67 व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024 - 25 ही स्पर्धा दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान वाडिया पार्क मैदानावर होणार आहे. या पाच दिवसात नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहण्याची संधी नगरसह जिल्ह्यातील कुस्तीशोकीनांना मिळणार आहे.सध्या या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे.