उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण देताना संस्थापक अध्यक्ष राजा माने.
मुंबई, प्रतिनिधी. (22.जानेवारी 2025.) : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथील नियोजित महाअधिवेशनाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल रात्री निमंत्रण देण्यात आले.संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ल संघटनेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटले.शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, महेश चिवटे आदींचा समावेश होता.
शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण पत्र दिले व संघटनेच्या वाटचालीची माहिती त्यांनां दिली.त्यांनी निमंत्रण स्वीकारले असून लवकरच तारीख निश्चित करण्याचा शब्द दिला.संघटनेच्यावतीने त्यांना श्रीविठ्ठल -रुक्मिणींची मूर्ती भेट देवून शुभेच्छा देण्यात आल्या.