डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सावंतवाडी येथे 06 एप्रिल 2025 रोजी होणार महाअधिवेशन.- राजा माने...
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सावंतवाडी महाअधिवेश ना. नितेश राणे यांनी स्वागताध्यक्ष तर डॉ.अच्युत भोसले यांनी सह स्वागत अध्यक्ष पद स्वीकारले..
सावंतवाडी,प्रतिनिधी. (27.जानेवारी 2025.) : देशातील पहिल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांची संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाअधिवेशन सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात ६ एप्रिल रोजी होणार असून राज्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या अधिवेशनासाठी निमंत्रित केले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून ३ हजार हून अधिक संपादक पत्रकार उपस्थित राहणार असून या महाअधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तर सहस्वागत अध्यक्षपदी डॉ.अच्युत भोसले हे राहणार आहेत, या ऐतिहासिक तिसऱ्या महाअधिवेशनाच्या संयोजक पदाची जबाबदारी संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर यांच्यावर सोपवली असल्याची माहिती राजा माने यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली.
या महाअधिवेशनासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग भरत मंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले ,आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे,माजी मंत्री व सिंधुदुर्ग चे आमदार दीपक केसरकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजा माने साहेब, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत ,कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य कार्यकारणी सदस्य कुंदन हुलावळे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर यांची उपस्थिती होती.
संघटनेचे यापूर्वी भिलार महाबळेश्वर व कनेरी मठ कोल्हापूर येथे महाअधिवेशन झाले होते सावंतवाडी येथे होणाऱ्या तिसऱ्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील आठ विभागातील ज्येष्ठ पत्रकार संपादकांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासह मान्यवर व्यक्तींची प्रकट मुलाखत, डिजिटल मीडिया मधील मान्यवर व अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन, परिसंवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत. राज्यभरातील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सभासदांनी या अधिवेशनासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी असे आवाहन यावेळी अध्यक्ष राजा माने यांनी केले आहे.