पुष्पलता काळे यांचे दुःखद निधन..
नेवासा,प्रतिनिधी.( 29 जानेवारी.2025.) : तालुक्यातील सोनई येथील प्रगतशील शेतकरी व मूळा कारखान्याचे सेवानिवृत्त अधिकारी अमृतराव काळे यांच्या पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका पुष्पलता काळे यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षे होते.
पुष्पलता काळे या धार्मिक, सामाजिक, आर्थिक व सहकार चळवळीशी संबंधित होत्या. त्यांनी बाभळेश्वर दूध संघ, मुळा सहकारी साखर कारखाना व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेचे संचालक पद भूषवले होते. परिसरातील धार्मिक चळवळीत, महिला चळवळीत त्यांचा मोलाचा सहभाग होता.
त्यांच्या निधनाबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय दादा विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले यांनी शोक व्यक्त केला आहे त्यांच्यावर सोनई येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शालिनीताई विखे, अहिल्या नगरच्या आयुक्त यशवंत डांगे, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगे व सुमतीताई घाडगे , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्ता पाटील, नाशिकचे माजी नगरसेवक अण्णा पाटील कोठावळे, सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी पंडितराव लोणारे, हायकोर्ट वकील ऍड. काकडे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
सेवानिवृत्त कृषी अधिकारी हेमंतराव काळे व शहरातील उद्योजक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलपटू शरद काळे पाटील हे दोन मुले, मनीषा कोठावळे (काळे) ही मुलगी, पती,नातवंडे, सुना असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे अनेकांनी शोक व्यक्त केला.