आंतरराष्ट्रीय नृत्यांगना वैष्णवी पाटील हिचा “सन्मान स्त्री शक्तीचा” सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मान...
पुणे, प्रतिनिधी. (31.जानेवारी 2025.) : कसबा मतदार संघातील भाजपा आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून पुण्यातील बाजीराव रोडवरील नातूबाग मैदानावर “सन्मान स्त्री शक्तीचा” गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणारा “सन्मान स्त्री शक्तीचा” सोहळा कसबा मतदारसंघात मोठ्या उत्साहात पार पडला.आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून भाजपच्या वतीने आयोजित या सोहळ्याला जवळपास 15 हजारांच्यावर महिलांनी उपस्थिती लावली. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आमदार हेमंत रासने आणि मृणाली रासने यांच्या माध्यमातून गेली दहा वर्षांपासून अखंडितपणे सन्मान स्त्री शक्तीचा गौरव सोहळा आणि भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येते. बाजीराव रोडवरील नातूबाग मैदानावर यंदा हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव योगीता भोसले, आंतरराष्ट्रीय नृत्यांगना वैष्णवी पाटील ,विश्वकप विजेता महिला खो-खो संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर, पत्रकार मीनाक्षी गुरव, समाजसेविका शर्मिला सय्यद,आणि साहित्य क्षेत्रासाठी वसुंधरा काशीकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.